बीड : अभिनेत्री करिना कपूरने तिच्या पहिल्या आणि दुसऱ्या गरोदरपणावर एक पुस्तक लिहील असल्याची माहिती सोशल मिडीयावर दिली होती. तिने या पुस्तकाला माझं तिसरं मुलं असल्याचंही म्हंटले होते. तिने पोस्ट शेअर केल्यानंतर या पुस्तकाची भरपूर चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता मात्र करीनाचे हेच पुस्तक वादातच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्यामुळे तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CRGVdbUpfPC/?utm_source=ig_web_copy_link
करिना कपूरने तिच्या दोन्ही प्रेग्नंसी काळातील अनुभवांच्या आधारावर ‘Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या नावावरून आता वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानंतर आता बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी करिनाविरोधात तक्रार दिली आहे.
करीना गर्भावस्थादरम्यान काही अनुभव तिच्या नवीन पुस्तकाद्वारे समोर आणणार आहे. ज्याचा फायदा गरोदर मातांना होऊ शकेल असे तिचे म्हणणे आहे. मात्र तिच्या या पुस्तकाला विरोध दर्शवल्याने तिच्यावर आता काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे जबरदस्त फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर…
- लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल रोको करु ; दरेकरांचा इशारा


