परभणी : मागील काही वर्षांपासून महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. या अत्याचारांना लगाम लावण्यासाठी सरकार प्रयत्न जरी करत असली तरी ते प्रयत्न तोटकी असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या अत्याचारांमध्ये आता सैन्यदलातील जवानांचे नाव येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत एका जवानाने युवतीला लग्नाचे आमीष दाखवून सतत अत्याचार केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. सैन्य दलातील जवानाविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीच्या सुट्टीसाठी पीडित युवती गंगाखेड तालुक्यातील चिलगरवाडी येेथे आजोळी गेली होती. २०१६ मध्ये ती चिलगरवाडी येथे गेली असता, याच गावातील लक्ष्मण धायगुडे याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांचेही फोनवर सतत बोलणे होत होते. याच दरम्यान २०१७ मध्ये लक्ष्मण धायगुडे हा सैन्य दलात भरती झाला. २०१९ मध्ये एक महिन्याची सुट्टी घेऊन लक्ष्मण हा गावाकडे आला होता.
यावेळी त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचा विषय काढल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत असे. अनेकदा लग्नाविषयी विचारणा केल्यानंतरही त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आई-वडिलांनीही या लग्नाला विरोध केल्यामुळे पीडित युवतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात लक्ष्मण याच्याविरोधात तक्रार दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिलेशनशिपबद्दल कियारा अडवाणीचे मोठे वक्तव्य
- प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी
- सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

