औरंंगाबाद : शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागात दोन घरफोड्या करीत जवळपास ८० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
जाधववाडी परिसरातील आदीत्यनगर येथील रहिवासी शामकुमार गजानन जोशी (वय ३०) हे घराला कुलूप लावून २० जून रोजी बाहेरगावी गेले होते.
शामकुमार जोशी यांच्या घराचे कडी-कोंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील कपाट फोडून कपाटातील सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण ६० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत, रघुवीर मधुकरराव कुकलकर (वय ३६,रा.कांचनवाडी) हे घराला कुलूप लावून कुटुंबियासह १२ ते २० जून दरम्यान अमरावती येथील अंजणगांव येथे गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी कुकलकर यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटातील २० हजाराचे सोने-चांदीचे दागीने चोरून नेले. विविध भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

