🕒 1 min read
आजकाल सोशल मीडियावर अनेक पाळीव प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. पाळीव प्राण्यांचे मालक सतत आपल्या प्राण्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. जे बघून चाहत्यांना आनंद मिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बुलडॉग ने रेनकोट परिधान केलेला असून पायात पिवळ्या रंगाचे बूट घालून तो वॉकसाठी बाहेर पडलेला दिसत आहे.
इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक बुलडॉग आपल्याला दिसत आहे जो पावसात रस्त्यावर फिरत आहे. आणि त्याने रेनकोट आणि पिवळ्या रंगाचे बूट परिधान केलेले आहे. रेनकोट आणि बूट मुळे हा बुलडॉग खूपच क्युट दिसत आहे.
Viral Video | रेनकोट घालून बुलडॉग घेत आहे पावसाचा आनंद, बघा हा क्यूट व्हिडिओ pic.twitter.com/kTWZbDDLUx
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 1, 2022
मिस्टर नेल्सन आणि मिस प्रीटी रोझ नावाच्या दोन बुलडॉगसाठी तयार केलेल्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पेजवर या दोन्ही बुलडॉक्सचे अनेक क्युट व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. नुकत्याच शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत 19.4M व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओमध्ये नेल्सन नावाचा बुलडॉग निळ्या रंगाचा रेनकोट आणि पिवळ्या रंगाचे बूट परिधान करून रस्त्यावर चालताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे, “पार्कमध्ये जाण्यासाठी” . वापरकर्त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील सतत शेअर होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!
- Chandrakant Khaire | “मी आता मैदानात उतरलोय, काय होईल…” चंद्रकांत खैरेंचा संदिपान भुमरे यांना इशारा
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
