🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु आहे. मलिक आणि फडणवीस दोघांनी परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि मलिकांच्या जावयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती समोर आली आहे.
निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
False accusations ruin lives. Before one accuses or condemns they must know what they are talking about. This defamation notice is for the false claims & statements which Mr. @Dev_Fadnavis has put on my family. We will not back down. pic.twitter.com/xsQYcgDhMb
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 11, 2021
याबाबत ट्विट करत निलोफर मलिक-खान यांनी म्हटले आहे की, ‘खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत केलेले खोटे दावे आणि विधानांबाबत केली होती. त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही’, असेही निलोफर त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधल्या…’, एनसीबीवर राऊतांचा हल्लाबोल
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून नवाब मलिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप!
- भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सगळे कपडे स्वच्छ होतात-संजय राऊत
- एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? भाजपचा सवाल
- ‘होय, आम्ही कामगारांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारतो, तुम्ही राजीनामा देणार का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

