Share

‘माझे एक मोठे स्वप्न…’ ; हिमा दासची पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताची स्टार धावपटू हिमादासने आत्तापर्यंत अनेक मोठे यश मिळवले आहे. तिच्या यशाच्या कारकिर्दीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिची शुक्रवारी(२६ फेब्रुवारी) आसाम पोलिसमध्ये उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवल यांनी गुवाहाटी येथे झालेल्या कार्यक्रमात तिला निवृत्तीचे अधिकृत पत्र सोपवले. यावेळी ५९७ उपनिरीक्षकांची देखील भरती करण्यात आली.

हिमा दासने उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर एक ट्विट केले आहे. यात तिने म्हटले आहे की ‘माझे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्याने मी आनंदी आहे. उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. मी हे पद गर्वाने भुषवेल. मी मुख्यमंत्र्यांची आभारी आहे. तसेच मी किरण रिजिजू आणि हिमंत बिस्वा यांची त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.’

तसेच तिने पुढे म्हटले की ‘मी माझ्या पालकांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे. तसेच माझ्या मार्गदर्शकांचे आणि ऍथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचेही आभार मानते. त्याचबरोबर आसाममधील नागरिकांचे आणि माझ्या चाहत्यांबद्दलही मी कृतज्ञ आहे.’

याच महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दासला राज्याची पोलिस उपअधिक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. सोनोवाल यांच्या मंत्रिमडळाने राज्यातील एकात्मिक क्रिडा धोरणात सुधारणा करण्याचेही ठरवले आहे. त्या अनुशंगाने त्यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रिडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार हिमा दासलाही नियुक्त करण्यात आले आहे.

हिमादासची कारकिर्द 

२०१८च्या जागतिक कनिष्ठ ४०० मीटर शर्यतीत तीनं ५०.७९ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर एप्रिल २०१९मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली.

द्युती चंद हिनंही १०० मीट शर्यतीत ११.४४ सेकंदाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या अमोज जेकबनं पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत वर्चस्व राखले. कर्नाटकच्या धनेश्वरी ए नं ११.८९ सेंकदाच्या वेळेसह दुसरे, तर महाराष्ट्राच्या डिंड्रा डुडली व्हाल्लाडॅरेसनं ११.९२ सेंकदाच्या वेळेस तिसरे स्थान पटकावलं. पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत अमोज जेकबनं ४६.०० सेकंदाची वेळ नोंदवली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!