Share

दहावी बारावीच्या परीक्षांबाबत होणार मोठा निर्णय, मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांची बैठक सुरु

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

यासोबतच, विरोधी पक्षासह महाविकास आघाडीतील नेते देखील आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाच्या बैठकांना गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांविना पास केलं जाणार असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार ? असा सवाल आता समोर उभा राहिला आहे.

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरु आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडून अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!