Share

सरकारचा मोठा निर्णय; अपघात सुरक्षेसाठी कारमध्ये ‘हे’ तंत्रज्ञान बंधनकारक

Published On: 

नवी दिल्ली: दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल आहे. हे अपघात रोखण्यासाठी सरकार कडून वेळोवेळी अनेक खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जातात. तर यामध्ये चारचाकी वाहनांसाठी तसेच दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळे नियम देखील घालून देण्यात आहे आहेत.

तर आता केंद्र सरकार अपघातामधील मृत्युंची संख्या कमी करण्याकरता महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. चारचाकी वाहनांमध्ये पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशांना एअरबॅग बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. तर अनेक कंपन्यांचे वाहन देखील असे अपघात होऊ नये यासाठी अशा एअरबॅग असलेल्या गाड्या डिझाईन केल्या जातात.

चारचाकीत एअरबॅग बंधनकारक करण्यामागे प्रवाशांना सुरक्षितता देणे हा मागचा उद्देश आहे. वाहन चालकाशेजारी एअरबॅगची सुरक्षा मिळाली तर प्रवासी सरक्षित राहू शकतील, असे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.

1 एप्रिलपासून नवीन वाहनांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य असतील. रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यापूर्वी कायदा मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठविला होता. ज्यात त्यांनी वाहन उत्पादकांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग बसविणे बंधनकारक करण्यात यावे असे नमूद केले होते. हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे. विद्यमान मॉडेल्ससाठी नवीन नियम 31 ऑगस्टपासून लागू केला जाईल.

1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये पुढील दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य असणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संबधीत प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी 1 एप्रिलपासून पुढील आसनांसाठी एअरबॅग बंधनकारक केले आहे.केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सध्या रस्त्यावर धावणाऱ्या कारमध्ये 31 ऑगस्टपर्यंत एअरबॅग लावणे बंधनकारक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!