🕒 1 min read
सातारा : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यामुळेच शासनाने सार्वजनिक,धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना काही दिवस बंदी घातलेली आहे.
असं असताना महाराष्ट्रात सर्वात मोठी समजली जाणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पार पाडली आहे. या यात्रेतील प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचे तीने तेरा वाजवले.
मागील आठ दिवसांपासून गावामध्ये येऊन गर्दी टाळण्यासाठी तालुका प्रशासन बगाड मिरवणूक करू नये म्हणून ग्रामस्थांना आवाहन करत होते. गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते.
तरीसुद्धा ग्रामस्थांनी आज नियमभंग करत बगाड यात्रा पार पाडली आहे. प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीने काम करून संबंधितांवर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करेल असे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी सांगितले. प्रशासनाचा आदेशाचे उल्लंघन व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारने उद्योग क्षेत्राचा विश्वास गमावल्याने महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात घट?
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर, पण दहावी-बारावीसह MPSC परीक्षा होणार
- मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार आता या हिंदी मालिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
