🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नोटा लोकशाहीला घातक असल्याचं म्हटले आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नोटा लोकशाहीला घातक आहे. मतदारांनी नोटा मताचा वापर न करता उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करावे असंही पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील हेही यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी कोथरूडमधून अर्ज दाखल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. ब्राम्हण महासंघाने आमचा उमेदवार हा स्थानिक असावा अशी मागणी केली होती. परंतु चर्चेनंतर ब्राम्हण महासंघाने पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये उपलब्ध उमेदवारांमधून जर कोणताही उमेदवार लायक वाटत नाही. त्यावेळेस मतदारांना मतदान करायचे असल्यासं ते नोटा या पर्यायाला निवडू शकतात.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181521100359884801?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181520898798448643?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
