🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये जागावाटपावरून मतभेद झाल्याचं दिसत आहे. मात्र या मतभेदांनंतर वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम खा. इम्तियाज जलील चांगलेच चर्चेत आले आहेत. आम्ही ओवेसी यांच्या शब्दाला मानतो त्यामुळे जलील काय म्हणतात याकडे फारसे लक्ष देत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावर इम्तियाज जलील उत्तरले आहेत.मला मानत नाही असे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो की मी प्रदेशाध्यक्ष आहे मलाही ओवैसी यांनी अधिकार दिले आहेत, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.
जलील पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी संपल्यात जमा आहे, जे आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हणायचे त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते सेना भाजपमध्ये जात आहेत. आमच्या सर्व्हे प्रमाणे आम्हाला 100 जागांवर उमेदवार देण्याएव्हढी ताकद आहे. त्यामुळे आम्ही १०० जागांसाठी मागणी केली आहे.तसेच आम्ही 74 उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकरांना पाठवली होती. त्यानंतर 74 सीट देऊ शकत नाही असा ईमेल द्वारे प्रतिसाद मिळाला. आम्ही चर्चेची तयारी दाखवली पण त्यांनी चर्चा केलीच नाही. पुण्यात प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांची मीटिंग ही झाली. त्यानंतर 2 दिवसांत प्रकाश आंबेडकर निर्णय देणार होते. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब यांनी ईमेल वर ओवैसी यांना केवळ 8 सीट देणार असल्याचे कळवले, असे जलील म्हणाले.
दरम्यान एमआयएम पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपला मान राखला नाही असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. वंचितकडून आठ जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वंचित आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता.
- ‘मिशन विधानसभा 2019’साठी मुख्यमंत्र्यांकडून खासदार काकडेंवर विशेष जबाबदारी?
- रेेल्वे स्टेशनवर इथून पुढे कुल्लडमध्ये मिळणार चहा, नितीन गडकरींची घोषणा
- ‘माझी लढाई व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीच्या माणसांच्या भल्यासाठी’
- कॉंग्रेस सोबत युती करणार नाही, एमआयएमसोबत युतीसाठी शेवटपर्यंत वाट पाहाणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

