🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर बोलण्यास त्यांनी टाळले. यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तसेच भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली. भुजबळ यांनी येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच आता छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार हे पाहणे औचित्याचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
-
दरवर्षी श्रावण-भाद्रपदात अर्थव्यवस्थेत मंदी येते : मोदी
-
अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी छगन भुजबळ करणार शिवसेनेत प्रवेश
-
कॉंग्रेसला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसहित १० नेते शिवसेनेच्या वाटेवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
