टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
अशातच उस्मानाबादमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यासह काँग्रेसच्या ३ तालुकाध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या सर्वांचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवले आहेत. राजीनाम्यानंतर हे सर्व नेते हे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आणखीच मजबूत होणार आहे.
प्रशांत चेडे यांनी राजीनामा दिलेले सर्व नेते हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश करतील. प्रशांत चेडे यांच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण पंचायत समिती, नगर पालिका आणि बाजार समिती यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था चेडेंच्या ताब्यात आहेत त्यामुळे या सर्व ठिकाणी आता शिवसेनेचे वर्चस्व निर्माण होणार आहे.
दरम्यान, चेडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आणि रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
- कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविलेल्या ‘या’ नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा
- राष्ट्रवादीच्या वाताहती मागे विखेंचा हात ? अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात
- ‘जे कपडे फाडायची भाषा करतात, त्यांच्यावर स्वतःचे कपडे फाडून घेण्याची वेळ येणार आहे’
- १३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
