Share

गुरूजी तालीमच्या मिरवणुकीत कारागृहातील कैद्यांचे ढोल-ताशा पथक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आज गणेशचतुर्थी. महाराष्ट्रसह देश-परदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणपती बाप्पाच्या आगमनासह प्रारंभ होत आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता, त्याच्या स्वागताची लगबग आणि त्याच्या सेवेचा आंनद लहानथोंरामधे ओसाडून वाहत आहे.

पावसाचं वातावरण असतानाही गणपतीच्या स्वागतासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत.पुण्यात श्री गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये येरवडा कारागृहातील कैद्यांचे एक पथक सहभागी झाले असून आज मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीत रथापुढे हे पथक ढोल ताशा वादन करून गणेश चरणी आपली सेवा अर्पण करीत आहेत.

मागील 25 दिवसांपासून या कैद्यांना येरवडा खुल्या कारागृहात प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारागृह विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नादब्रहम ढोल ताशा पथकाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कैद्यांना वादनाचे प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या पथकाच्या कार्यकर्त्यांनी मागील 25 दिवसांपासून कारागृहामध्ये या कैद्यांना प्रशिक्षण दिले. कैद्यांच्या या पथकामध्ये 30 कैदी बांधवांचा समावेश असून त्यामधील दोघेजण ताशा वादन करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!