टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.
ही यात्रा नांदेड येथे आली असता आयोजित सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘या लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे. एक नवा इतिहास तुम्ही केलेला आहे असं विधान केले आहे.
तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘मी जो काही आहे, त्याची दोनच कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्ष आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझ्यासारखा मीच आहे. आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाहीये. पण मी एक धोरण घेतलंय जीना यहा मरना यहा.’असं विधान केले आहे.
पुढे बोलताना चिखलीकर यांनी देवेंद्र फडणवीस साहेब, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुमचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करणार. त्या भागामध्ये तुम्हाला जो अपेक्षित भारतीय जनता पक्ष आहे. तो नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होणार, तो नारा सार्थ केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले.
- पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- राष्ट्रवादीला मोठा धक्का, शिवस्वराज्य यात्रेकडे उदयनराजे भोसलेंनी फिरवली पाठ
- मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा अजेंडा : मुख्यमंत्री
- ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी : मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

