🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : येत्या पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करू, असं आश्र्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या कडा- आष्टी इथं महाजनादेश यात्रा जाहीर सभेत बोलत होते. बीड जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला बदलण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा संधी द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं काल मुख्यमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा झाल्या. दुष्काळी मराठवाड्यासाठी समुद्राचं पाणी आणून दुष्काळ हा भूतकाळ करण्यासाठी पाच हजार कोटी रूपयांची तरतुद केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बीड इथल्या जाहीर सभेत बोलतांना सांगितलं. या सभांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेसाठी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत. दुपारी एक वाजता शहागड इथं, अडीच वाजता अंबड इथं त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर ते औरंगाबादकडं प्रयाण करणार असून जिल्ह्यात आडूळ इथून महाजनादेश यात्रा सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…


