परभणी : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा अजेंडा असून यासाठी शेजारी आंध्र व तेलंगना राज्यात वाहून जाणारे 102 टिएमसी पाणी आडवून त्याचा सिंचन व पिण्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी परभणीत दिली.
महाजनादेश यात्रेनिमित्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी परभणी शहरात आले होते. रात्री परभणीत मुक्काम केल्यानंतर त्यांनी सकाळी 11 वाजता पत्रकाशी वार्तालाप केला. ते म्हणाले, सातत्याने मराठवाड्यात दुष्काळ सुरु आहे. मराठवाड्यातील जनतेला दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयोग करत आहे. पावसाच्या वेळा बदलल्याने मराठवाड्यावर पडणाऱ्या पावसाचे 102 टिएमसी पाणी हे शेजारी आंध्र व तेलगंणा राज्यात वाहून जाते. ते पाणी कसे थांबविता येईल याचा अभ्यास करून वाहून जाणारे 102 टिएमसी पाणी मराठवाड्यातच आडवून ठेवले जाईल. त्याचा मराठवाड्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग केला जाईल असे ते म्हणाले.
कोकणातील पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते ते आता लिफ्ट करून मराठवाड्यात आणले जाईल. यासाठी सर्व जिल्ह्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत असे ही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

