Share

तुम्हाला रसायनांचा विकास हवा आहे की आम्ही केलेला विकास पाहिजे ? – सुळे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या संवाद दौऱ्यात नाशिक येथे बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.

नाशिक येथे बोलताना सुप्रिया सुळे यांनी ‘मी परवा मुख्यमंत्र्यांना विचारलं, तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर साफसुथरा आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो. त्याचं उत्तर त्यांनी काल दिल. ते म्हणाले सुप्रिया सुळे, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे असं विधान केले.

पुढे बोलताना सुळे यांनी ‘मी सायन्स स्टुंडट आहे. सगळीच रसायनं चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायनं नको, कीटकनाशकं नको म्हणतात. महिला रसायनं असलेल्या भाज्या नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दरम्यान, बीड येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांनी सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोला सुळे यांच्या संवाद दौऱ्याला लगावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!