Share

अरुण जेटली यांच्या निधनामुळे माझं वैयक्तिक नुकसान झाले – अमित शाह

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले अरुण जेटली यांच्या निधनामुळे माझं वैयक्तिक नुकसान झाले आहे असे अमित शाह म्हणाले.

दरम्यान पीएम मोदी यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, की अरुण जेटली यांच्या निधनाने मी सच्चा मित्र गमावला आहे. ज्यांना मी दशकांपासून ओळखत होतो याचा मला अभिमान होता. त्यांची आकलन क्षमता जेवढी होती त्या तोडीचा खूपच कमी लोक आहेत. ते आनंदात जगले. ते अनेक आनंदाचे क्षण पाठिमागे ठेवून गेले आहेत. आम्हाला त्यांची सदैव आठवण येत राहिल.

मोदी यांनी ट्विट करून भाजप आणि अरुण जेटली यांचं एक अतूट नात होत. एक प्रखर विद्यार्धी नेता म्हणून त्यांनी आणिबाणीच्या काळात लोकशाही रक्षणात अजोड योगदान दिले होते. आमच्या पक्षातील ते लोकप्रिय नेते होते. असे ट्विट करून जेटलींना श्रद्धांजली वाहून आठवणींना उजाळा दिला.

जेटली यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!