टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिकुटुंब रोख पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच जलद गतीने नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना सुरु करून पूरग्रस्त नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याच प्रमाणे रस्ते, पूल सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, पूरग्रस्तांना अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. गावागावांमधून नागरिक होईल तशी मदत करत आहे. अनेक कलाकरांनी माणुसकी जपत पूरग्रस्तांना मदत करत आहे. पूरपरिस्थितीमुळे तेथील नागरिकांच्या घरात आणि डोळ्यात अश्रू आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘पूरग्रस्तांना घरच्या पेक्षा चांगली सुविधा उपलब्ध करून देतोय’
#महापूर : राज्यातील निवडणुका पुढे ढकला आणि राष्ट्रपती राजवट लागू करा : कॉंग्रेस
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन हळूहळू येतंय पूर्वपदावर
द मम्मी रिटन्स : मुलाच्या नाकर्तेपणामुळे सोनिया गांधींना कॉंग्रेसची धुरा सांभाळावी लागणार


