टीम महाराष्ट्र देशा : सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे.
याविषयी बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘उत्तम व्यवस्था उभा करणं हे सर्वात मोठं चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध आपण करुन देत आहोत’, अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तसेच राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-
‘या’ चार नेत्यांपैकी एका नेत्याची लागणार कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी
-
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ
-
पावसाची शक्यता वर्तवण्याइतके आपलं विज्ञान प्रगत नाही : देवेंद्र फडणवीस

