🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा– कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, सैन्यदल, नौदल, तटरक्षक दल युद्धपातळीवर बचाव कार्य करत असल्याचं, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना तातडीची मदत पुरवण्यासाठी राज्य सरकारनं १५४ कोटी रुपयांचा मदतनिधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत केला आहे. तसंच पूरग्रस्त भागातला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४० पथकं काम करत आहेत.नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळं २१ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं केलेल्या पंचनाम्यात ही स्थिती आढळली असून हा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यात पुराची पाणी पातळी कमी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात ७६ बोटी उपलब्ध आहेत, सध्या सांगलीवाडी परिसरात अन्नाची सुमारे तीन हजार पाकिटे हेलिकॉप्टर आणि बोटीव्दारे पोहोचवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास पाच हजार अन्न पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातही पूरस्थिती गंभीर होत असून, शहादा, अक्कलकुवा आदी गावातल्या दोनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक नद्या, नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. धुळे शहरात पावसामुळे कालही शाळा बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातून इतर गावी जाणाऱ्या बस गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातले नऊ मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
अमरावती जिल्ह्यात सतत झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं प्रमुख राज्यमार्ग बंद आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दर्यापूर तालुक्यातल्या सांगोला इथं जलसंधारण विभागाची शेततळी फुटून शेतीचं मोठं नुकसान झालं. मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं तापी आणि गडा नदीवरील पूलं पाण्याखाली गेली आहेत, पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकं पोहोचली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूरचा धोका टळला, मात्र सांगलीत अजूनही हायअलर्ट
सांगलीत जगभरातून मदत येतेय, पण परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत? – आव्हाड
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले आज सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

