🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर गिरीश महाजन समर्थकांनी आजीत पवार यांचा निषेध केला आहे. नाशिक येथे भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आपला राग व्यक्त केला आहे. नाशिकमधल्या राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांविरोधात निषेधाचं पोस्टर लावलं आहे.
एका आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर भाष्य करताना ‘नाच्या’ असा शब्द प्रयोग केला होता. यावरून राजकीय चांगलेच वातावरण तापले. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. तर जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले.
दरम्यान नाशिकमध्ये पूरपरिस्थिती असताना काही मंत्री नाचत होते. नाचायचं काम तुमचं नाही, टीव्हीला बघितलं की नाही, काय चाललंय. पाणी आलेलं बघा; नाचताय काय, नाचायचं काम तुमचं नाही, नाचायचं काम नाचणारे करतील, इथे पूर आला आणि मंत्रिमहोदय नाचतात. असं म्हणत अजित पवार यांनी महाजनांवर आक्षेपार्ह टीका केली होती.
काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत
भारतासोबत आस्था असणाऱ्या लोकांना बाजूला करून ३७० हटवण्याचा निर्णय – पवार
राष्ट्रवादीतले अनेक नेते दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात – महाजन
अजितदादांचे ‘ते’ वक्तव्य नैराश्यातून, कधीकाळी पाण्याबद्दल त्यांनी काढलेले शब्द जनता विसरली नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
