Share

अजितदादांचे ‘ते’ वक्तव्य नैराश्यातून, कधीकाळी पाण्याबद्दल त्यांनी काढलेले शब्द जनता विसरली नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी आज शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख ‘नाच्या’ असा केला. नाशिकमध्ये पूर आला असताना मंत्रीमहोदय नाचतात. ‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं पाहावं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. आता गिरीश महाजन यांनी देखील पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

अजित दादांना काय झाल हे कळत नाही, नाशिकमधील पुराच्या परिस्थितीमध्ये मी लोकांची मदत करत होतो. गेली ७० वर्षे देशाच्या माथ्यावर लागलेला कलंक कलम ३७० हटवत भाजप सरकारने दूर केला आहे. कलम ३७० हटवणे हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असल्याने आपण लोकांसोबत नाचलो, मात्र कधीकाळी दुष्काळामध्ये लोक अजित पवारांकडे गेल्यावर ते काय म्हणले हे सर्वाना माहित आहे, असं म्हणत महाजन यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. दरम्यान, अजित दादांनी नैराश्यातून असे वक्तव्य केल्याची टीका त्यांनी केली आहे.

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना अजित पवार
यांनी गिरीश महाजन यांच्यावर खरपूस टीका केली. नाशिकमध्ये पूर आला आणि मंत्रीमहोदय नाचतात. ‘नाच्या’चं काम तुमचं नाही मंत्री महोदय. तुम्ही पाण्याचं पाहावं अशा शब्दात महाजन यांच्यावर टीका केली, पाणी बघितल्यावर माणसाला कळत नाही काय करावं. लोक अडचणीत आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. जनता पुरात आणि मुख्यमंत्री प्रचारात आहेत. यात्रा महत्त्वाची की महाराष्ट्रातील सामान्य माणूस, असा प्रश्नही पवार यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

‘नाच्या’चं काम सोडून पाण्याचं बघा; अजित पवारांचा गिरीश महाजनांना सल्ला

लोकसभेला कॉंग्रेसमध्ये, तर विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!