Share

पुणे : उपमहापौरपदाच्या शिवसेनेच्या मागणीचा सहानभूतीपूर्वक विचार करू : गोगावले

Published On: 

🕒 1 min read

दीपक पाठक/पुणे : लोकसभेसाठी पुन्हा एकदा सेना-भाजप एकत्र आल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेत सत्तेत वाटा मिळविण्यासाठी सेनेने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपकडे पुणे महापालिकेतील उपमहापौरपदाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या या मागणीचा भाजप सहानभूतीपूर्वक विचार करेल असं पुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी म्हटलं आहे.

पुणे महापालिकेतील विविध विषय समित्यांसाठी सदस्य निवड प्रक्रिया सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उपमहापौरपदाची मागणी केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत पद आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याची मागणी सेनेकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर चार क्षेत्रीय कार्यालयातील अध्यक्षपद देण्याची मागणीही पुणे महापालिकेतील शिवसेनेचे नेते संजय भोसले केली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून अद्याप यासंदर्भातील कोणतेही पत्र अजून आम्हाला मिळाले नाही असं गोगावले यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना केला. याबाबतचे सर्व निर्णय पक्षश्रेष्टी घेणार असले तरीही  शिवसेनेच्या या मागणीचा भाजप सहानभूतीपूर्वक विचार करेल असं देखील स्पष्ट केलं. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेच्या या मागणीला पाठींबा दिला तसेच जर सेनेला पुणे महापालिकेतील उपमहापौरपद हवं असेल तर मग मुंबई महानगरपालिकेतील महापौरपद भाजपला अडीच वर्षे मिळावे अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!