Share

“…तरीही रिकामटेकडे मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन बिनबुडाचे आरोप करताय”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खान(Aryan Khan) क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर(Sameer Wankhede) लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लाच प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकही नेमण्यात आले होते. परंतु या प्रकरणात अद्यापही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे हा तपास काही काळासाठी थांबविण्यात आला आहे. याला अनुसरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’खोदा पहाड आणि चुहा पण सापडला नाही. समीर वानखेडे यांच्याविरोधात बोटभर पुरावा देखील सापडला नाही. तरीही रिकामटेकडे नवाब मलिक नव्या पत्रकार परिषदा घेऊन नवे बिनबुडाचे आरोप करतायत. लाज न लज्जा’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. फक्त एवढेच नाही तर हे प्रकरण ड्रग्जचं थेट खंडणी आणि वसुलीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!