🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून(२२ डिसें.)सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विधिमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपचे आंदोलन सुरू असतांना भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजप नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी देखील सहभाग नोंदवला. आंदोलनावेळी घोषणाबाजी सुरु असतांनाच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) सभागृहात दाखल झाले. त्यावेळी लगेच नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठीच नितेश राणेंनी अशी घोषणाबाजी केल्याच्या चर्चांना विधानभवनात उधाण आले आहे.
दरम्यान, या व्हिडीओसंदर्भात नितेश राणे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की,’मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याय म्याव करणारी शिवसेना आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
