Share

‘सोनिया गांधीसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा’, नितेश राणेंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांना दिवाळीपासून हा त्रास जाणवत होता. उद्धव यांच्यावर आज गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलीय. त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.

उपस्थितांसमोर बोलताना राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे. फक्त ठाकरे लावले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असे वादग्रस्त वक्तव्यही नितेश राणे यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!