🕒 1 min read
मुंबई : बहुप्रतीक्षित राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एसएस राजामौली आणखी एक बिग बजेट चित्रपट घेऊन येत आहेत. दरम्यान, आता ‘आरआरआर’चे पहिले गाणे ‘नाचो नाचो’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण जोरदार नाचताना दिसत आहेत. हे गाणे प्रदर्शित होताच यूट्यूबवर कव्हर झाले आहे. हा आणखी एक बिग बजेट चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.
राजामौलींच्या या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, ऑलिव्हिया मॉरिस महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर पाहून चित्रपटाची भव्यता स्पष्ट होते. दरम्यान हे गाणे प्रदर्शित होताच लोकप्रिय झाले आहे. आकर्षक बीट्स, हाय ऑन एनर्जी हे गाणे चाहत्यांना नाचायला भाग पाडते. ‘नाचो नाचो’ हे गाणे विशाल मिश्रा, राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे. हे गाणे प्रेम रक्षित यांनी कोरिओग्राफ केले आहे. हे गाणे ट्विटरवर शेअर करताना राम चरणने लिहिले की, तो ‘नाचो नाचो’च्या तालावर नाचल्याशिवाय राहू शकत नाही. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यातील डान्सची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. दोन सुपरस्टार एकाच पडद्यावर पाहायला मिळणे ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानी आहे. चित्रपटातील या गाण्याने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘आरआरआर’ची कथा १९२० च्या कालखंडावर आधारित आहे. यात स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांची कथा दाखवण्यात आली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.
बाहुबलीनंतर राजामौली ‘आरआरआर’सोबत परतत आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असून त्याची एकूण किंमत ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. बाहुबलीने देश-विदेशात भरपूर कमाई केली होती. ‘आरआरआर’ अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
- भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘आधी 150 रुपये वाढवायचे नंतर रुपया, सव्वा रुपया कमी करायचे, हे धंदे बंद करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

