मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडी सरकारमधील मंंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात विविध यंत्रणांकडं तक्रारी करत आहेत. नुकतेच सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील कागदपत्रे ईडीला दिली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केले. सोमय्या यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
‘कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढं येईल किंवा केला नसेल तर तेही पुढं येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे. त्याच पद्धतीनं ते आरोप करत आहेत. पण काही जण एवढी कागदपत्रं दाखवतात की जणू हेच चौकशी करणार आहेत. कुठल्याही गोष्टीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्या चौकशी करतीलच, दुसरं कुणी करणार आहे का,’ असा टोला अजित पवार यांनी सोमय्यांना लगावला आहे.
‘कोणी काही आरोप करत असले तरी त्याच्याकडं पुरावा मागितला जाईल. नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. यातल्या अनेक प्रकरणांमध्ये पूर्वीच्या सरकारच्या काळातही चौकशी झालेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागानं एका न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सुद्धा चौकशी केलीय,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर भाजप पेट्रोल ओतून आग लावतात’
- जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल – अजित पवार
- ‘मेळावे घेणे, चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडं रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?’
- तुमच्याकडे तपास यंत्रणा, शोधू शकता; मनिषा कायंदेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
