Share

‘शिवसेनेच्याच खासदारांची इच्छा आहे की महाविकास आघाडी सरकार पडावे’, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा खळबळजनक दावा

Published On: 

🕒 1 min read

ठाणे : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियानाचा कोकण विभागीय मेळावा बुधवारी ठाण्यात पार पडला. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या खासदारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार कधी पडते, असे सत्ताधारी शिवसेनेच्याच खासदारांना वाटते आहे, असा दावा कपिल पाटील यांनी केला. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

मेळाव्यात पाटील म्हणाले, शिवसेनेचे खासदार मला अनेक वेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, शेरे माझ्याकडे भरपूर आहेत. आता त्यांनाच त्यांचे सरकार कधी पडतेय, अशी भावना त्यांची झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्हाला कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. फडणवीस यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती, असे शिवसेना खासदार आपल्याला नेहमीच सांगत असतात,’ असे पाटील यांनी सांगितले.

तर ओबीसी मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ओबीसी आरक्षण केवळ गेलं नाही तर ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होतोय. त्याचसाही हे ओबीसी जागर अभियान आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. यांची इकोसिस्टीम एका सुरात खोटे बोलते. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात देले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेलं आहे.

इम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी इम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारचं मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते. बारा बुलतेदारांना या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. ते बोलघेवड्यांचे सरकार आहे. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!