🕒 1 min read
लातूर : जिल्हाचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लातूर दौऱ्यावर आहेत. या निमित्त एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांशी संवाद साधला. विलास नगर परिसरात असलेल्या समस्या आणि मिळत असलेल्या सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. इतकेच नाही तर या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
लातूर शहरातील नियोजित कार्यक्रमाला जात असताना शनिवारी पालकमंत्री अमित देशमुख यांनी विलास नगर परिसरात थांबून इथल्या नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील नागरिकांना असलेल्या समस्या तातडीने सोडण्यासंदर्भातल्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही समस्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
#लातूर शहरातील कार्यक्रमासाठी जाताना आज सकाळी प्रभाग क्र ८ मधील #विलास नगर येथे थांबून तेथील नागरिकांशी संवाद साधला.त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या तक्रारी तातडीने दूर करण्याच्या संबंधितांना सूचना देऊन,कबाले वाटपाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.#congressforIndia pic.twitter.com/OEIXoFgSgo
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) October 16, 2021
लातूर शहर महानगर पालिकेतही काँग्रेसचाच महापौर आहे. त्यामुळे अमित देशमुख यांचे महानगर पालिकेवरही लक्ष असते. याच माध्यमातून त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

