🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद येत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या या बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. तसेच अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही बंदला निषेध करत सरकारवर टीका केली आहे.
निषेधाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. "बंद" हा एकच पर्याय नाही. या दिड वर्षात जनता हवालदिल झाली आहे. काळजीपोटी सरकारने या आधी बऱ्याच गोष्टी बंद ठेवल्या होत्या- आहेत. आता आणखी किती "बंद"??? नका अंत पाहू.
— ???????????????????? ???????????????????????? (@mekedarshinde) October 10, 2021
केदार शिंदे यांनी ट्विट करत लिहिले की, ‘निषेधाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. “बंद” हा एकच पर्याय नाही. या दिड वर्षात जनता हवालदिल झाली आहे. काळजीपोटी सरकारने या आधी बऱ्याच गोष्टी बंद ठेवल्या होत्या- आहेत. आता आणखी किती “बंद”??? नका अंत पाहू.’ लॉकडाऊन मुळे आधीच लोकांचे हाल झाले असताना आता सर्व पूर्वपदावर येत असताना हा बंद करण योग्य नसल्याचे केदार शिंदेने म्हंटले आहे.
दरम्यान, आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक व्यापाऱ्यांनी आज दुकाने चालू ठेवली होती. मात्र यावेळी काही कार्यकर्त्यांनी वाद घालत दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. तर सोलापूर,बीडमधील काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे चित्र देखील दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत यशोमती ठाकूर यांनी जनतेचे मानले आभार
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘आशिष मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे’; नाना पटोले
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

