Share

बीडमध्ये दुकानं उघडणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवसेनेकडून गुलाब भेट

Published On: 

बीड : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदचे ऐलान केले आहे. हा बंद यशश्वी करण्यासाठी बीडमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे अवाहन करण्यात येत असून प्रतिष्ठाने उघडलेल्या व्यापाऱ्यांना गुलाबाचे फुल भेट देऊन दुकान बंद करण्याचे अवाहन शिवसेनेतर्फे केले जात आहे.

बीडमध्ये बंद यशश्वी करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. सकाळी ६ वाजता शहरातील बाजारपेठेत सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते गस्त घालताना दिसून येत आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी सहकार्य करण्याचे अवाहनही करण्यात येत आहे. दरम्यान बीड शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी गस्त घालताना दिसून येत आहेत. बंद दरम्यान अद्यापपर्यंत बीड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडत आहे.

यावेळी शिवसेना नेते परमेश्वर सातपुते, उप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बप्पासाहेब घुगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड शहरात अत्यावश्यक सेवेला या बंद तून वगळण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!