औरंगाबाद : मत्स्य व्यवसायासाठी सिल्लोड शहरात स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून मच्छिमारी करणाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालोद येथे दिले. खेळणा मच्छीमार संस्थेच्या वतीने पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मत्स्य बीजारोपन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतीपिकांसह इतर क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत मच्छिमारांचीही मासे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास देवू, असे त्यांनी स्पष्ट केले. मत्स्य विभाग मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन मच्छीमारांच्या प्रश्नांची सोडवणूक करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच आहे, त्याच प्रमाणे मच्छीमारांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या वतीनेही मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत वंचितची एन्ट्री; आंबेडकरांकडून विश्वासू सहकाऱ्याला तिकीट
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

