Share

शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी सरकारने सरसकट एकरी 50 हजारांची मदत करावी; दानवेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

परभणी : राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भामध्ये तसेच राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीकाचं, जमिनीचं मोठं नुसकान झालं आहे. शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानीचे पंचनामे राज्य सरकारकडून सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस हे नुकाग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही शेतकऱ्यांच्या पीकाची पाहणी केली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही पेरणी तर वाया गेलीच पण, सोबतच शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना जर कधी रब्बी पेरणी करायची असेल तर सरसकट एकरी 50 हजार रुपयांची राज्य सरकारने करावी, अशी मागणी यावेळी दानवेंनी केली आहे.

शेतकऱ्यांनी खरीप पीकासाठी जे कर्ज उचललं ते कर्ज सरकारने माफ करावं, अशीही मागणी यावेळी रावसाहेब दानवेंनी केली आहे. दानवेंनी  परभणीतील पालम येथील शेतकऱ्यांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!