Share

पवार-गडकरींमध्ये चर्चा, पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यात भेट झाली. भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लावण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. सोबतच पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याचेही बापट म्हणाले. दरम्यान, यावेळी बापट यांनी गडकरींना एक पत्रही दिले.

पवार आणि गडकरी यांच्यातील चर्चेसंदर्भात माहिती देत बापट म्हणाले की,’पुणे विमानतळासमोरील १२ एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्याबाबतही आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. नितीन गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल’, असे बापट म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पवार आणि गडकरींमध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आजची बैठक फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. परंतु, त्यांनाही अशी मदत करता आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निकष बदलून मदत करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!