🕒 1 min read
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी कोल्हापूरला येत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधून परतले आणि कोल्हापुरात होणारा संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती.
यामुळेच रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या माघारी फिरले आणि पोलिसांनी नि:श्वास टाकला. पण या निमित्ताने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या एका हाय होल्टेज ड्रामावर तात्पुरता पडदा पडला. दरम्यान झालेल्या या सर्व प्रकरणावर आता भाजपने ठाकरे सरकारला चांगलेच घेरले असल्याचे पहायला मिळत आहे.
भाजपचे नेते व प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ‘हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या पण कारवाई केली नाही, १०० कोटीच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री गायब आहेत खुलेआम भ्रष्टाचार करू पण कोणी बोलायच नाही, लिहायच नाही, पहायच नाही अन्यथा थेट कारवाई करणार. ही तालीबानी वृत्ती जनता ऐकून घेणार नाही.’ असे ट्वीट करत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हे तर पळ काढण्यासाठी
बळ वापरणारे भ्रष्टाचारी सरकार
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या पण कारवाई नाही
१०० कोटीच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री गायब
खुलेआम भ्रष्टाचार करू पण कोणी बोलायच नाही, लिहायच नाही, पहायच नाही अन्यथा थेट कारवाई. ही तालीबानी वृत्ती जनता ऐकून घेणार नाही— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’, मुनगंटीवार यांची टीका
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
