🕒 1 min read
उस्मानाबाद : निवडणुकीपुरते राजकारण सोडून निवडणुका संपल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित यावे. गावातील अंतर्गत वाद बाजूला सारून गावच्या विकासासाठी आणि कामाच्या दर्जाबाबत सर्वांनी लक्ष द्यावे. अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या गावातील प्रत्येक रखडलेल्या कामामध्ये लक्ष घालावे. गावातील विविध रखडलेल्या शेत रस्त्यांबाबत आणि पाणंद रस्त्यांबाबत आणि साठवण तलाव ते गाव या जोडणाऱ्या रस्त्याबाबत गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी एकत्रितपणे मार्ग काढावा, असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील विविध गावांना भेट देवून त्यांनी गावातील विकास कामांसंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली. गावात वैयक्तिक लाभार्थींसाठी ज्या योजना आहेत या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी आणि गावातील नागरिकांनी गावांच्या विकासात हातभार लावावा. विविध योजनांबाबत जनजागृती करण्याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. MREGS अंतर्गत विहिर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, बांधावर/शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांच्या माहिती पुस्तीका गावामध्ये वितरण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
MREGS सारखी उत्कृष्ठ योजना आपण देशाला दिली मग आपल्या राज्यात याचा विस्तार का होत नाही? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मार्फ़त चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत दर्जा ढासळू देऊ नये आणि जर दर्जा ढासळला तर कंत्राटदारांना नोटीस काढावी. तसेच जलसंधारण विभागामार्फत सुरू असणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही कामाचा दर्जा उच्च असावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुश्रीफांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर चंद्रकातदादांचा खुलासा
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
