पुणे : महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपात येण्याची ऑफर दिली होती. असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच खुलासा केला आहे. मुश्रीफांना अशी कोणतीही ऑफर दिली नव्हती, असे स्पष्ट करत मुश्रीफ ड्रामा करत आहेत. असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषेत दिले आहे.
चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात, कुणालाही त्रास देण्याचा हेतू आमचा नाही. घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा हा ड्रामा सुरु आहे. अमुक-तमुक करणार, माझे कार्यकर्ते रस्त्यावर येणार, हा ड्रामा बंद करा. मला त्यांना सांगायचे आहे की, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचे अस्तित्व संपले आहे. हे फक्त मुश्रीफांमुळे शक्य झाले. त्यामुळे त्यांनी मला भाजपात येण्याची ऑफर दिली, पण मी ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यामुळे त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली. आता महाविकास अघाडी प्रबळ झाली असून भाजपाला यश मिळत नसल्याने हे सगळं सुरु आहे. असे हसन मुश्रीफ म्हणाले होते.
हसन मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझे नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणे ही मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे ! pic.twitter.com/eI0jzQn0hZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 20, 2021
त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार होते त्याच सोलापूर जिल्ह्यात आता आमचे आठ आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपाचे कोल्हापूरचे दोन्ही खासदार युतीचे, सातारामध्ये भाजपा शून्य होती आता दोन आमदार भाजपाचे आहेत शिवाय पुणे, पिंपरी महानगर पालिकेतसुद्धा भाजपाचे वर्चस्व आहे. सोलापूर, सांगली जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात आहे.
हसन मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझे नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणे ही मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. असा टोलाही त्यांनी मुश्रीफांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

