Share

अभिनेता रजनीकांतची धाकटी मुलगी ‘सौंदर्या’ दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अग्रेसर

Published On: 

मुंबई : बाबा, चंद्रमुखी, अनबे आर्युरी, शिवकाशी मधून दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करत दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांत देखील सिने इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. सौंदर्या रजनीकांतने तांत्रिक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. तिने परदेशी चित्रपट भारतात प्रसिद्ध करण्याविषयी सांगितले, असे करणारी ती दक्षिण भारतातील पहिली टेक्नीशियन होती.

दरवर्षीप्रमाणे कुटूंबियांसोबत आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. सौंदर्या रजनीकांत यांचा जन्म २० सप्टेंबर १९८४ रोजी मद्रास येथे झाला. त्यांनी चेन्नईमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतले. तिने १९९९ मध्ये कारकिर्दीला  सुरुवात केली. पदयाप्पा चित्रपटात ती ग्राफिक डिझायनर म्हणून दिसली. या चित्रपटातील मुख्य अभिनेता रजनीकांत होते. सौंदर्याने टेक्निकल फील्डमध्ये करिअर करायचे ठरवले. यानंतर तिने बाबा, चंद्रमुखी, अनबे आर्युरी, शिवकाशी, शिवाजी, गोवा, कोचाडयान आणि वेलैइल्ला पट्टाधारी २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सौंदर्या रजनीकांत हिने दोन विवाह केले. तिने २०१० मध्ये अश्विन रामकुमारसोबत पहिले लग्न केले. तिचे पहिले लग्न सात वर्षे टिकले आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर विशालगन वनगामुडीसोबत २०१९ मध्ये चेन्नईच्या लीला पॅलेसमध्ये लग्न केले. विशालगन व्यवसायाने एक अभिनेता आणि बिझनेसमन आहे. सौंदर्या सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासह शेअर केलेल्या फोटोस चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस् येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!