Share

‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?

Published On: 

🕒 1 min read

कराड: भाजप नेते किरीट सोमय्या यांची लाईव्ह पत्रकार परिषद कराड येथे सुरु आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज त्यांना कराड येथेच पोलिसांनी रोखलं आहे. यावरच त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत आहेत.

यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता आलं नाही. तसेच मला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचं आहे, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं? असा सवालही त्यांनी केला आहे. तर ठाकरे सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकारने इतिहास रचला आहे. आज घोटाळेबाजांऐवजी ठाकरे सरकार घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक करतंय.

ठाकरे सरकारची ही सर्व ठोकशाही आहे. मला गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, एवढेच नाही तर मला धक्काबुक्कीही करण्यात आली. मी विचारलं की, कोणत्या अधिकाराअंतर्गत मला रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला.असे सांगण्यात आले. मात्र यावर मी आक्षेप घेतला. मला ते पत्र दाखवण्यात यावे. अन्यथा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!