Share

४० वर्षात १९ मुख्यमंत्री झाले; परंतु संतपीठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच करुन दाखवले- संदिपान भुमरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या २५ वर्षांपासून संतपीठाला चालना देण्यासाठी विधीमंडळात प्रश्न मांडले. मोर्चे काढले. आंदोलने केली. ४० वर्षात १९ मुख्यमंत्री झाले. परंतु संतपीठ सुरू होऊ शकले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पैठणला संतपीठ व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतपीठ लवकर सुरू व्हावे यासाठी गांभीर्याने लक्ष घातले. आणि आज स्वप्न प्रत्यक्षात उतरले. रोजगार व हमी मंत्री संदिपान भुमरे बोलत होते. शुक्रवारी पैठण येथे संतपीठाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. बाबासाहेब विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली संतपीठ ईमारतीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. पैठण येथील संतपीठाला जागतिक विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्याची जबादारी आमची असून या संतपीठात देशासह जगभरातील विद्यार्थ्यांना येथून संतसाहित्याच्या अभ्यासक्रमाची पदवी मिळवता यावी.

यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करणार असून लवकरच या संतपीठाला जागतिक कीर्ती लाभेल. असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की गेल्या २५ वर्षांपासून मी संतपीठ होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मागील ६ महिन्यांपासून तर मी अहोरात्र संतपीठासाठी प्रयत्नशील राहिलो. अखेर आज मुक्तिसंग्रामदिनी हे स्वप्न साकार झाले असून मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. अशी कृतज्ञता रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!