🕒 1 min read
भिवंडी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. भिवंडी पालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करुन दिल्यास भिवंडीतही म्हाडा २० हजार घरांची उभारणी करेल, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. तसेच महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली आहे. भिवंडी क्षेत्रात अनेक अनधिकृत घरे नागरिकांनी बांधली आहेत. तर दरवर्षी याठिकाणी पावसामुळे अनेक दुर्घटना घडत घडतात. यातच याठिकाणी शुक्रवारी सकाळी आजमी नगर भागात एक अनधिकृत इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा बळी गेला आहे.
#भिवंडी मध्ये #MHADA बांधणार 20000 परवडणारी घर
भिवंडी महानगर पालिका कडून घेणार 25 एकर जमीन— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2021
दरम्यान या घटनेमुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपये मदत आणि त्यांच्यावरील उपचाराचा खर्च महापालिका प्रशासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा-पालकमंत्री
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासाठी थांबवू नका, ‘वंचित’ची भूमीका
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- अखेर तिसरी घंटा वाजणार; नाट्यगृहे खुली करण्यास ‘या’ तारखेपासून परवानगी
- राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान – सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
