मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार, राज्यातील बहुतांश निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा ठाकरे सरकारने दिली आहे. बहुतांशी निर्बंध ठाकरे सरकारने हटवले असले तरी सिनेमागृह आणि नाट्यगृह यांच्याबाबतचे निर्बंध हे कायम ठेवण्यात आले होते.
यामुळे मराठी कलाकारांसह नाट्यभूमीशी निगडित व्यक्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नाटकांवर छोट्या-मोठ्या अभिनेत्यांसह विविध कलाकारांची व कमर्चाऱ्यांची उपजीविका अवलंबून असते. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात सिनेमांना मोठ्याप्रमाणात OTT चे प्लॅटफॉर्म मिळाले असून ऑनलाईनद्वारे सिनेमांची चांगली चलती सुरु आहे. मात्र, महाराष्ट्राची किंबहुना देशाची ओळख असलेल्या नाट्यभूमीची, त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांची, कलाकार वर्गाची दुरावस्था झाली आहे.
आता नाट्यप्रेमींसह कलाकारांसाठी आनंदाची बातमी आहे. 50 टक्क्यांच्या मर्यादेसह 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसा आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धाडीवर अजित पवारांचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाले…
- ओबीसी आरक्षणाचा तिढा ‘या’ महिन्यापर्यंत संपणार; मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितली डेडलाईन
- सरकारी संस्था विकायला काढल्याची टीका करत चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा
- ‘बिंज बार’ खाद्यप्रेमींसाठी एक नवी पर्वणी; मन होईल तेव्हा भेळ आणि चिवड्याच्या पारंपारिक चवीचा घ्या आस्वाद !
- ‘पुन्हा सांगतोय, भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा’; चंद्रकांतदादांचे शिवसेना खासदाराला आव्हान

