औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर प्रस्तावित रेल्वे मार्ग, विभागीय क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येत असलेला ‘सिंथेटीक ट्रॅक’, संत एकनाथ महाराज संतपीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, सफारी पार्क, झकास पठार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘उभारी’ प्रकल्प असे अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे आहेत. असे महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासंदर्भात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पाडली. पालकमंत्री म्हणाले की, ‘जिल्हा व शहराच्या विकासासाठी आगामी काळात अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद मंजूर केली जाईल. या योजनामध्ये औरंगाबाद – अहमदनगर रेल्वे मार्गाचा समावेश असेल. या मार्गामुळे मनमाडला जाऊन पुन्हा नगरला जाणारा वळसा वाचेल. शिवाय औरंगाबाद – पुणे या शहराचे औद्यागिक संबंध घनिष्ठ असल्यामुळे या मार्गाचा फायदा मालाची आणि लोकांच्या वाहतूकीसाठी होईल. महत्वाचे म्हणजे ही योजना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल.’
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या राज्यसमोर एक चिंतेचा विषय आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासन गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, ‘आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘उभारी’ नावाची विशेष मोहिम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तपशीलवार प्रस्ताव सादर केला आहे. या मोहिमेसाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती राज्य शासनाकडून मंजूर केली जाईल. याशिवाय जिल्ह्यात हवाई पर्यटनाला चालना देण्याबरोबरच जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गामुळे देखील वाहतूक वेगाने होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धाडीवर अजित पवारांचं पहिल्यांदाच भाष्य; म्हणाले…
- ओबीसी आरक्षणाचा तिढा ‘या’ महिन्यापर्यंत संपणार; मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितली डेडलाईन
- सरकारी संस्था विकायला काढल्याची टीका करत चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा
- ‘बिंज बार’ खाद्यप्रेमींसाठी एक नवी पर्वणी; मन होईल तेव्हा भेळ आणि चिवड्याच्या पारंपारिक चवीचा घ्या आस्वाद !
- ‘पुन्हा सांगतोय, भाजपाशिवाय मुंबईत खासदार होऊन दाखवा’; चंद्रकांतदादांचे शिवसेना खासदाराला आव्हान

