Share

युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना

Published On: 

मुंबई : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता.

परंतु आता महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही हीच स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे.

न्यू साऊथ वेल्समध्ये 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांमध्ये 30 ते 49 या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक होती. यातील 45 रुग्ण हे 30 ते 40 या वयोगटातील होते. तसेच या वयोगटापेक्षाही कमी वयातील 13 जणांना आयसीयूत दाखल करण्यात आले. आयसीयूतील रुग्णांपैकी 36 टक्के प्रमाण तरुणांचे आहे. बाधितांमध्ये तरुणांची वाढलेली संख्या लक्षात घेता चिंतेत भर पडली आहे. तरुणांमध्ये डेल्टाची लागण अधिक होत असल्याने तज्ज्ञ देखील हैराण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!