🕒 1 min read
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. केंद्र सरकार मुबलक लसींचा साठा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप महाविकास आघडीतील मंत्री करत आहेत.
आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.
यासोबतच, ‘लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत आहे. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते. 30 लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगते. मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का ?’ असा सवाल देखील दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! अफगाणिस्तानच्या शाळेवर बॉम्बहल्ला, ६८ विद्यार्थिनींचा मृत्यू
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- चंद्रकांत पाटलांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला चांगलच ठाऊक ; मुश्रीफांचा टोला
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
