Share

देशमुखांचे बार बंद झाले; राज ठाकरेंचा सणसणीत टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये काल पुन्हा एकदा टाळेबंदी व उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. काल ( ५ एप्रिल ) राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी टाळेबंदी, निर्बंध व उपाययोजना ह्या मुद्द्यांवर दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली याची माहिती दिली आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठीचे उपाय, शाळा-कॉलेज बंद असूनही पूर्ण फी आकारणी, लसीकरण या मुद्द्यांपासून ते पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नांपर्यंत आपली भूमिका मांडली आहे. ‘मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यास पोलिसांना कोणी सांगितले हे महत्वाचे आहे. ते बाहेर आले पाहिजे. या मूळ मुद्द्याला अनेक फाटे फुटले आहेत.’ असं म्हणतानाच आता लॉकडाऊनमुळे देशमुखांचे बार बंद झाले आहेत अशी टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.

‘सध्या राज्यात कडक नियम लावण्यात आले आहेत. आता हे नियम अधिक कठोर होण्याची शक्यता देखील आहे. यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन केल्यामुळे गोंधळ उडाला होता. आता नागरिकांनी नियम पाळले हवेत. देशमुखांचे बार देखील आता बंद झाले आहेत,’ असा टोला राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!