🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या कोराना आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध विषयांमध्ये सुचना देखील केल्या आहेत. दरम्यान शहरातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, सतिष चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, हरिभाऊ बागडे यांनी विविध विषयांमध्ये सुचना दिल्या आहेत.
दरम्यान या वेळी खासदार इम्तियाज जलील यांनी घाटीमधील 850 रिक्त पदा भरण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे पदे तात्काळ भरावीत. आणि सध्याची कोविडची परिस्थिती असतानाही अनेक डॉक्टरर्स तसेच इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मुलाखत देत आहेत. पण रुजु होत नाहीत. हे अत्यंत गंभीर आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीबांना जेवणाची सोय उपलब्ध करुन द्या. अनेक दवाखान्यात व्हेंटीलेटर्स आहेत. परंतु ते हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे. या वरुन जिल्हाधिकारी यांनी यावेळी जे डॉक्टरर्स रुजु होत नाहीत त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचे आदेश अधिष्ठाता यांना दिले आहेत.
यावेळी आमदार हरीभाऊ बागडे यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुट द्यावी, कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. जेणेकरुन त्याचे प्राण जाणार नाहीत. मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सूचना या वेळी बागडेंनी मांडल्या. आमदार अतुल सावे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनीधी यांच्यात नियमित बैठका व्हाव्यात, लॉकडाऊनच्या दरम्यान कम्युनीटी किचनच्या माध्यमातून गरजूंना जेवण उपलब्ध करुन द्यावे, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहे.
आमदार सतिष चव्हाण यांनी ज्या प्रमाणे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा कंपन्यांना आपला माल घरपोच वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणात स्थानिक व्यापाऱ्यांना सुध्दा आपला माल घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, रुग्णालयात मनुष्यबळ वाढवावे, मंगलकार्यालयांवर बंदी आणावी जेणेकरुन गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याच्या सूचना त्यांनी मांडल्या. आमदार संजय सिरसाट यांनी रुग्ण ॲडमीट झाल्यावर त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू व्हावेत. याची दक्षता घ्यावी तसेच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा रुग्णालय उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सुचना यावेळी केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
